मुख्य बातमी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा रविवारी

८१० उमेदवारांची व्यवस्था रत्नागिरीतील उपकेंद्रांवर

रत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ रविवारी (११ जानेवारी) शहरातील दोन उपकेंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. एकूण ८१० उमेदवार ही परीक्षा देणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परीक्षेची बैठक व्यवस्था अशी : पटवर्धन हायस्कूल या उपकेंद्रावर RT001001 ते RT001360, तर फाटक हायस्कूल या उपकेंद्रावर RT002001 ते RT002450 बैठक व्यवस्था आहे.

आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/ गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!