मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सांगलीतील कला प्रदर्शनात कोसुंबची सुकन्या तेजश्री जाधव यांच्या कलाकृतीची निवड

आबलोली (संदेश कदम) : यावर्षी घेण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी मुंबईतील एसएनडीटी‌ वुमन्स युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेली तेजश्री राहुल जाधव हिच्या चित्र कलाकृतीची निवड करण्यात आली आहे.

मुंबईतील कला संचलनातर्फे ६३ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे यावर्षी आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सांगली येथे पार पडणार असून या प्रदर्शनात मुंबईतील एसएनडीटी‌ वुमन्स युनिव्हर्सिटी, चर्नी रोड, मुंबई येथे मास्टर इन फाईन आर्टचे शिक्षण घेत असलेली संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावची सुकन्या तेजश्री राहुल जाधव यांच्या Sympathy (सांत्वन) या चित्र कलाकृतीची निवड करण्यात आली आहे. या कला प्रदर्शनात कोकण सुकन्येच्या कलाकृतीची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल विद्यार्थी वर्ग, प्राध्यापक, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांनी अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तेजश्री ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लांजा शाखेचे सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक राहुल जाधव व सौ. निलांबरी यांची द्वितीय कन्या आहे.

दरम्यान, मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत (ता. चिपळूण) या कौटुंबिक सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांची तेजश्री हिने प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना भगवान गौतम बुद्धांची स्वहस्ते साकारलेली कलाकृती भेट दिली. तिच्या या कार्यकर्तृत्वाची स्तुती करून त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!