आरोग्यमुख्य बातमी

सेंट थॉमस शाळेत १०५ मुलींना एचपीव्ही लसीकरण यशस्वी

रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य मंदिर, पोमेंडी (बु.), यांच्या वतीने सेंट थॉमस शाळा येथे ९ ते १४ वयोगटातील १०५ मुलींना एचपीव्ही (HPV) लस देण्यात आली.

ही लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली असून लसीकरणानंतर कुठल्याही प्रकारची गुंतागुंत अथवा दुष्परिणाम आढळून आले नाहीत. लसीकरण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थिनी, पालकवर्ग तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे उत्तम सहकार्य व सकारात्मक प्रतिसाद लाभला.

ही लस गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, योग्य वयात एचपीव्ही लसीकरण केल्यास भविष्यातील गंभीर आजार टाळण्यास मदत होते.

या लसीकरणास चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल सूर्यवंशी, समुदाय आरोग्य अधिकारी अंभोरे, आरोग्य सेविका श्रीमती रसाळ, पालशेतकर, स्वाती शिंदे, अनुश्री शिंदे तसेच आरोग्यसेवक चव्हाण, गट प्रवर्तक इंदुलकर, आशा सेविका पांचाळ, लांजेकर, कुळीये, मोरे, तेरवणकर उपस्थित होत्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!