मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
आबलोली ग्रामपंचायतीत राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली निर्मल ग्रामपंचायतीत राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात आणि जल्लोष साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन, दीप प्रज्वलन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, ग्रामपंचायत महसूल अधिकारी विनोद जोशी, पोस्ट मास्तर नित्यानंद कुळये, ग्रामपंचायत सदस्य वृषाली वैद्य, रूपाली कदम, महसूल सेवक प्रकाश बोडेकर, आशा सेविका विशाखा कदम, सानिद्या रेपाळ, अंगणवाडी सेविका रिया रेपाळ, प्रिया कदम, ग्रामपंचायत कर्मचारी योगेश भोसले, ग्रामस्थ गोपीनाथ शिर्के, योगेश पालशेतकर, संजय चौघुले आदी उपस्थित होते.



