मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर आगारात शिवजयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर आगारात प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ. शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात पूजा शिवाजी आवळे या विद्यार्थिनीचे भाषण लक्षवेधी ठरले.

गुहागर आगारात दरवर्षी प्रशासकीय जयंती साजरी होते; मात्र यावर्षी प्रथमच सार्वजनिक स्वरूपात छ. शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम आगारप्रमुख अशोक चव्हाण यांच्यासह गुहागर तालुका प्रवाशी संघटना अध्यक्ष पराग कांबळे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून आगार प्रमुख अशोक चव्हाण यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सहाय्य्क कार्यशाळा अधिकारी मंदार कदम, आगार लेखाकार स्नेहल पालकर, वरिष्ठ लिपिक शंकर केंद्रे, प्रवीण वळंजू, रवी घाग, सुनील पवार, अस्मित चव्हाण, राजा गायकवाड, गणेश वामन, सिद्धेश लाकडे, रविकुमार गायकवाड, दिलीप रिंडे, के. डी. सकपाळ, सुषमा घोंगे, अश्विन दांडेगावकर, प्रवीण भांगरे, आर. बी. गायकवाड, रामा पुंड यांच्यासह चालक, वाहक व प्रवाशी तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे नातेवाईकही यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना रामा पुंड यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. आगार प्रमुख श्री. चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामा पुंड यांनी केले. यावेळी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. जयंतीचा गोडवा वाढविण्यासाठी सर्वांना गुहागर आगाराच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!