रत्नागिरीतील नाटेकर, गांधी, कीर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेतील दिमाखदार निकाल
विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालय (आर्ट्स), विजयालक्ष्मी (गोदुताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि श्रीमान रमेशजी कीर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांनी बारावीच्या २०२५ च्या परीक्षेत अत्युत्तम यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली आहे.
यंदाच्या परीक्षेत महाविद्यालयाने आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही शाखांमध्ये भक्कम निकाल नोंदवला असून, विशेषतः सायन्स शाखेचा १०० टक्के निकाल ही गौरवास्पद बाब ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि संस्थेच्या कार्यक्षम व्यवस्थापनाला याचे श्रेय दिले जात आहे. आर्ट्स शाखेचा निकाल ९७.५३ टक्के, तर कॉमर्स शाखेचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे.
शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी असे : आर्ट्स शाखा : श्रावणी प्रवीण धनावडे – ८५.६७ टक्के, भक्ती नितीन वायंगणकर – ८४ टक्के, सावरी संजय झगडे – ८२.८३ टक्के. कॉमर्स शाखा : सीमा ओमप्रकाश जांगिड – ८८.३३ टक्के, सानिका संजय गावडे – ८२.१७ टक्के, हिनाकुमारी इंद्रमल – ८१.६७ टक्के. सायन्स शाखा : सानिका रूपेश केतकर – ६९.६७ टक्के. प्रियदा नितीन राजे – ६४.३३ टक्के, वेदांत दत्ताराम मोहिते – ६३.०० टक्के.

या यशामध्ये महाविद्यालयातील शैक्षणिक पथकाचा मोठा वाटा असून, अनुभवी मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, तसेच पर्यवेक्षक अमर लवंदे आणि श्रीमती कल्पना शिरोळकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारी दरम्यान सातत्याने मार्गदर्शन केले.
निकालानंतर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्षा श्रीमती नमिता कीर आणि कार्यवाह सुनील वणजु यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे पदाधिकारी, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
या दिमाखदार निकालामुळे विजू नाटेकर (आर्ट्स), गांधी (कॉमर्स) आणि कीर (सायन्स) महाविद्यालयांनी पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.



