मुख्य बातमीशैक्षणिक

पाचवी, आठवी शिष्यवृती परीक्षा प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनवर उपलब्ध

रत्नागिरी : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २२ फेब्रुवारी या एकाच दिवशी घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृती परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रवेश पत्र प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (पुणे) आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) ही २२ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचे प्रवेशपत्र १३ जानेवारीपासून संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!