क्रीडामुख्य बातमी

रत्नागिरीच्या गणराज तायक्वांदो क्लबतर्फे गुरुपौर्णिमा साजरी

रत्नागिरी : येथील गणराज तायक्वांदो क्लबच्या अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पदकप्राप्त खेळाडूंनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, एशियन युनियन कोच प्रशांत मनिषा मनोज मकवाना तसेच महिला प्रशिक्षक सौ. रंजना मोंडूला यांच्या मार्गदर्शन गुरुपौर्णिमेच्या दिवस साजरा केला.

गणराज क्लबने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू घडविले आहेत. यात काही शिक्षक, तर काही डॉक्टर, काही नेव्हीमध्ये काम करत आहेत. डॉ. मयुरेश नडगिरी, क्रीडा शिक्षक अनिकेत पवार, नेव्हीमध्ये अदिती शिवगण, सिविल इंजिनीरिंग साहिल शिवगण, खेलो इंडिया सारखं स्पर्धा मध्ये गौरी विलणकार, त्रिशा मयेकर सुवर्ण पदक, CBSE सुवर्ण पदक सुरभी पाटील, गौरी विलणकर, राष्ट्रीय स्पर्धा सहभाग अथर्व मुरकुटे, राज्य स्पर्धा रोप्य पदक बरखा सेंद, कास्य पदक दुर्वा हातिसकर अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशिक्षकांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आशिर्वाद घेतले. यावेळी विधी विवेककुमार दुबे, अहद नवीद वस्ता, नीरज प्रशांत मकवाना, आहाना आशिष रसाळ, आध्या आशिष रसाळ, जैनब वसिम काझी, तीर्था प्रशांत मकवाना, अनया अभिज्ञ वणजू, समर्थ सुशांत विचारे, अथर्व आत्माराम मुरकुटे, विहान प्रसाद शेट्ये, बरखा सर्फराज संदे, दुर्वा मंदार हातिसकर, युमना सर्फराज संदे, अर्णव अभिज्ञ वणजू, अखिलेश वांयगणकर, मीरा वांयगणकर, नीरज प्रशांत मकवाना, स्पर्श किरण रेडीज, माहीरा मयुर कदम, स्वराली समीर जाधव, शौर्या समीर जाधव, ध्रुव देशमुख, त्रिशा सचिन मयेकर, केशर कुणाल शेरे, गौरी अभिजीत विलणकर, श्रेष्ठा अभिजीत विलणकर, स्वानंद पंकज तुपे, गंधाली वणजू, आफ्रीन काझी, सारिका विलणकर, साक्षी मयेकर, शीतल वांयगणकर, तरन्नुम संदे, आशका रसाळ, स्वाती मुरकुटे, मानसी हातिसकर विद्यार्थी उपस्थित होते.

गणराज क्लबचे पदाधिकारी अध्यक्ष वकील सौ. पूजा प्रसाद शेट्ये, उपाध्यक्ष सौ. साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूळा, सदस्य सौ. स्नेहा मोरे, परेश मोंडूळा, श्रीमती शलका जावकर, पालक वर्ग, वरिष्ठ खेळाडू डॉ. मयुरेश नडगिरी, आदीती शिवगण, गौरी विलणकर, साहील शिवगण, स्वानंद तुपे आदींनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!