कुर्णे ग्रामपंचायतीत गप्पी मासे पैदास केंद्र

रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबु अंतर्गत उपकेंद्र पुनस मधील ग्रामपंचायत कुर्णे येथे आवारात नव्याने गप्पी मासे पैदास केंद्र उभारण्यात आले असून, या केंद्रांमध्ये सरपंच सौ. मनाली माने यांच्या हस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबूचे आरोग्य निरीक्षक दिलीप विठ्ठल गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत गप्पी मासे सोडण्यात आले.
यावेळी सुधीर एकनाथ लिंगायत, एएनएम पुनस श्रीमती प्रीती कांबळे व ग्राम पंचायत अधिकारी कुर्णे सौ. घोसाळे, लिपिक सुहास माने अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी श्री. लिंगायत यांनी ग्रामस्थांना वेळोवेळी किटकजन्य आजारांबाबत माहिती देवून लोकांना गप्पी माशांचे महत्त्व पटवून सांगितले. आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव यांनी समाधान व्यक्त करतानाच आपल्या भागात परराज्यांतून आलेल्या मजूरांचे लवकरच हत्तीरोग सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले.



