मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
कुडली तरबंदर शाळेत प्रजासत्ताक दिनी शिव-प्रभा संस्थेकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा कुडली तरबंदर शाळा नं. १ मध्ये प्रजासत्ताक दिनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपुत्र आणि शिव-प्रभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांनी राबविला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
यावेळी जिल्हा परिषद शाळा कुडली तरबंदर शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर निमकर, शिक्षक प्रकाश गुरसळे, दीपक कुनघाडकर, प्रसाद सपाटे, अजित कांबळे या शिक्षकांसह ग्रामस्थ आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी आनंद जाधव यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी संस्थेला आणि आनंद जाधव यांना धन्यवाद दिले.



