मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सावर्डे येथे उद्या अजित पवारांची शोकसभा 

चिपळूण : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या (३० जानेवारी) सकाळी १० वाजता आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात (सावर्डे) येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.

काल (२८ जानेवारी) घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्याप्रती श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने ही शोकसभा घेण्यात येणार असून, त्यांचे नेतृत्व, विकासाभिमुख कार्य, दूरदृष्टी आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली निष्ठा यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान व जनतेचा खंबीर आधार असलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

याप्रसंगी मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक तसेच सह्याद्री परिवारातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!