कोकण कट्टा आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत पाटपन्हाळे, अंजनवेल, पालपेणे व तळवली हायस्कूलचे सुयश

आबलोली : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोकण कट्टा आयोजित गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, दुर्गाबाई हरी माध्यमिक विद्यालय अंजनवेल, वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या विद्यालयांमध्ये हस्ताक्षर स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटामध्ये नुकतीच संपन्न झाली होती. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये या विद्यालयांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून सुयश संपादन केले आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त कोकण कट्टातर्फे गतवर्षाप्रमाणे यंदाही हस्ताक्षर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, दुर्गाबाई हरी माध्यमिक विद्यालय अंजनवेल, वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या विद्यालयांमध्ये नुकतीच झाली. या स्पर्धेमध्ये या विद्यालयांतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात इयत्ता पाचवी व सहावी या गटात अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक : मधुरा प्रमोद शेलार (सहावी) अथर्व अनिल घाणेकर (सहावी) व शौर्य सुजित जोशी (पाचवी). इयत्ता सातवी ते नववी गट अनुक्रमे तीन क्रमांक : समृद्धी सुरेश आंबेकर (नववी), श्रीया संतोष नागेश (नववी), श्रद्धा अनिल धुमक (नववी).
दुर्गाबाई हरी माध्यमिक विद्यालय अंजनवेल विद्यालयात इयत्ता सातवी ते नववी गटामध्ये सोनाक्षी सचिन घाणेकर (आठवी), वैदही श्रीकांत पेडणेकर (आठवी), श्रावणी अनिल घडशी (नववी) यांनी प्रथम तीन क्रमांकाचे सुयश पटकावले. वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे विद्यालयात आर्या विजय गुढेकर व अनुष्का नरेंद्र म्हस्कर (विभागून प्रथम क्रमांक), शमिका मुकुंद नाचरे व निसर्गा अनिल म्हस्कर (विभागून द्वितीय क्रमांक) तसेच विनया संतोष पवार व धनश्री रामचंद्र रहाटे (विभागून तृतीय क्रमांक) यांनी सुयश मिळवले.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली विद्यालयात इयत्ता पाचवी ते सहावी गटामध्ये मंथन योगेश साळवी (सहावी), समर्थ किशोर चिवेलकर (सहावी), स्वरा प्रवीण साळवी (पाचवी) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. इयत्ता सातवी ते नववी गटात सायली दत्ताराम पिंपळकर (नववी), आयुषी सुभाष डाकवे (नववी), दीक्षा महेंद्र पडवळ (नववी) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक संपादन केले. या विद्यालयांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना आयोजकांतर्फे आकर्षक चषक, प्रमाणपत्र, पुस्तक, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे , अध्यक्ष नितीन कुलकर्णी, सचिव सुनील वनकुंद्रे, कोषाध्यक्ष सुजित कदम व पदाधिकारी यांचे पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, पर्यवेक्षक जी. डी. नेरले, अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. डी. गोरीवले, पालपेणे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. व्ही. हासबे व तळवली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. ए. थरकार व विद्यालयांतील शिक्षकवृंद यांनी स्पर्धा आयोजित करून शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल आयोजक कोकण कट्टा यांचे धन्यवाद मानले.
या स्पर्धेसाठी पाटपन्हाळे विद्यालयाचे शिक्षक एस. वाय. भिडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल पाटपन्हाळे विद्यालयातर्फे पर्यवेक्षक जी. डी. नेरले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हस्ताक्षर स्पर्धेतील सुयशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व पालक यांनी अभिनंदन केले.


