बारावी व दहावी परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च रोजी व इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येत आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरता राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संबंधितांचे भ्रमणध्वनी क्रमांक असे : 9960644411, 7972573742, 9834084593, 9359978315, 8169202214, 9371661255, 7208429381, 7709156068, 8421150528, 9404783996.
हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी व परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था पत्रिकेसंबंधित प्रश्न आदीबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे (पुणे) सचिव सचिव दीपक माळी यांनी केले आहे.



