मुख्य बातमी

देविदास इंगळे यांना पदोन्नती 

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई १३६ चे रत्नागिरी तालुकाध्यक्ष देविदास इंगळे यांना विस्तार अधिकारी ग्रामपंचायत या पदावर पदोन्नती झाल्याचे आदेश रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी नुकतेच पारित केले आहेत. त्यानुसार श्री. इंगळे यांची गुहागर पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत या पदी पदोन्नती झाली आहे.

श्री. इंगळे यांनी यापूर्वी राजापूर तालुक्यातील कुवेशी, दळे, जैतापूर, माडबन, जुवेजैतपूर या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक म्हणून तसेच रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी, गावखडी, पूर्णगड, कासारवेली, काळबादेवी, नेवरे, कोतवडे, धामणसे या ठिकाणी ग्रामविकास अधिकारीपदी काम केले आहे. तसेच त्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन जिल्हा सहसचिव, ग्रामसेवक युनियन तालुका अध्यक्ष कास्ट ट्राइब संघटना तालुका अध्यक्ष RMBKS जिल्हाध्यक्ष या पदावर उत्तम कामगिरी केली आहे त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल त्यांना १९९९ मध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला आहे.

श्री. इंगळे यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पदोन्नतीबद्दल त्यांचा कोतवडे ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती सदस्य स्वप्नील उर्फ तारक मयेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संतोष बारगोडे, माजी सरपंच तुफिल पटेल, माजी उपसरपंच स्वप्नील पड्याळ, ग्रामपंचायत सदस्य पायल पांचाळ, दिया कांबळे, ज्योती मयेकर, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पदोन्नतीबद्दल श्री. इंगळे यांनी जिल्हा परिषद प्रशासन तसेच तालुका प्रशासन यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!