राजापुरात महायुतीचाच झेंडा

राजापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाअंती महायुतीने तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटासहीत १२ पंचायत समितीच्या गणामध्ये आघाडी मिळवली आहे. या निवडणुकीत उद्धवसेनेसहीत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे .
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहाही गटांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठ्या मतांची आघाडी घेतली आहे. सकाळपासून अतिशय धीम्या गतीने सुरू असणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेमुळे सायंकाळी ४ वाजता आठवी फेरी जाहीर झाली असून या सर्व फेऱ्यांमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे . तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीतील शिंदेसेनेच्या १० पैकी १० तर भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या धोपेश्वर पंचायत समिती गणा मध्ये भाजपच्या अभिजीत गुरव यांनी सुमारे १०० मतांची आघाडी घेत अपक्ष उमेदवार (शिंदेसेनापुरस्कृत) योगेश नकाशे यांना मागे टाकले आहे.



