मुख्य बातमी

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पीएम सूर्यघर योजना राबवण्यासंदर्भात मार्गदर्शनासाठी सभा

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या तालुक्यांमधल्या ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडे छतावर सौर ऊर्जानिर्मितीसाठी जागा उपलब्ध असेल, अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांची प्राधान्याने निवड केली जाणार आहे.

या योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची सभा १४ जुलैला सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जयस्तंभ (रत्नागिरी) येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. रत्नागिरी जिल्हा सहकारी हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, तसेच महावितरणचे अधिकारी या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला रत्नागिरी तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून माहिती घ्यावी, असे आवाहन सहायक निबंधक (सहकारी संस्था) साहेबराव पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!