मुख्य बातमी
श्री रामेश्वर गीता भवन रिक्षा स्टँडतर्फे १७ फेब्रुवारी रोजी सत्यनारायणाची महापूजा

रत्नागिरी : येथील श्री रामेश्वर गीता भवन रिक्षा स्टँड तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी उद्या (१७ फेब्रुवारी) रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त सर्व भाविकांना तीर्थ महाप्रसाद दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत देण्यात येणार आहे.
तसेच सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन भजन मंडळ बुवा प्रीतेश पंडये आणि पखवाज साथ श्रीयश शेट्ये यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सर्व भाविकांनी महापुजेच्या दर्शनाचा आणि त्यानिमित्त आयोजित भजनाचा लाभ घ्यावा, असे मंडळाचे अध्यक्ष जगदीश मयेकर यांनी आवाहन केले आहे.



