मुख्य बातमी

स्वामी समर्थ मंदिराचा उद्या वर्धापनदिन

रत्नागिरी : विठ्ठल मंदिर संस्थेच्या आवारातील श्री स्वामी समर्थ मंदिराचा सहावा वर्धापन दिन श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या वतीने उद्या (२४ मे) साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

सकाळी ६ वाजता काकडा आरती, त्यानंतर ६.३० वाजता अभिषेक व समृद्ध अभिषेक व पूजा करण्यात येईल. त्यानंतर सामुदायिक अभिषेक व आरती होईल. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी महाआरती आणि महानैवैद्य आणि त्यानंतर महाप्रसाद होईल सायंकाळी ४:३० वाजता स्वामिनी भजन मंडळाचे भजन होईल. सायंकाळी ६.३० वाजता कायम आरती व त्यानंतर ७.३० वाजता सुश्राव्य भजन होईल. संपूर्ण दिवस असा भरगच्च कार्यक्रम होणार असून, सर्व स्वामी भक्तांनी या दिवशी श्री विठ्ठल मंदिर येथे स्वामी मंदिरात दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी राजन फाळके (९४०३५६४४४१), प्रमोद रेडीज (९४०३५६५३०१), विजय पेडणेकर (९४२११३७६९७), पराग तोडणकर (७३८७५०३३६०) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!