जि.प. शाळा पूर्णगड न.१ मध्ये शिवजयंती उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. १ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रथम रॅली काढून ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध लेझीम नृत्याचे विविध प्रकार सादर केले. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ,पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गीत गायन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी उत्तम माहिती दिली, मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालकांचे व शाळा व्यवस्थापन समितीचे बहुमोल सहकार्य लाभले. उपक्रमासाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, तृप्ती शिरगावकर यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख संजय राणे सर, पावस बीट विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे यांनी समाधान व्यक्त केले.


