मुख्य बातमी

रा. भा. शिर्के प्रशालेमध्ये संविधान दिवस उत्साहात संपन्न

रत्नागिरी : शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेमध्ये स्वराज्यसभा व सांस्कृतिक विभागातर्फे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

राज्यघटना दिन म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय उत्सवच असतो. जगातील सर्वोच्च लिखित संविधान म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. संविधानाचे महत्त्व आणि संवेदनशीलता विद्यार्थीदशेत मूल्यसंस्कार रूपात बिंबवण्यासाठी प्रशालेत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शिर्के प्रशालेतील संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी पांढरे (BA.BEd.LLB) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी भारतीय संविधानाची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये व नागरिक म्हणून आपली भूमिका ह्या विषयावर विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय संविधान निर्मितीतील राष्ट्रीय नेत्यांचे योगदान सखोलपणे विशद करून सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. आयरे, श्री. बिरादार, श्री. क्षीरसागर, श्री. मासये आदी उपस्थित होते.

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. पवार, पर्यवेक्षिका सौ. काजरेकर आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक श्री. वासावे यांनी केले. आभारप्रदर्शन श्री. क्षीरसागर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!