मुख्य बातमी

ऑब्झर्व्हर ऑन स्पेशल ड्युटी पॅनेलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व सैनिक (सुबेदार व त्यावरील समकक्ष पदाचे तसेच नौदल व वायुसेनेतील समकक्ष अधिकारी), ज्यांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांनी राष्ट्रीय मुक्त विद्यालयी  शिक्षण संस्था, प्रादेशिक केंद्र पुणे यांच्या वतीने एप्रिल-मे २०२६ परीक्षेसाठी ऑब्झर्व्हर ऑन स्पेशल ड्युटी फ्लाईंग स्कॉड म्हणून पॅनल तयार करण्यात येत आहे.

या कामासाठी मानधन ७५० प्रति दिवस देण्यात येणार असून त्यासोबत प्रवास भत्ता ५०० रुपये, ४०० रुपये, व ३०० रुपये (शहर श्रेणी अ, ब व क नुसार) देय राहील.

इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी निर्धारित अर्ज नमुना प्राप्त करून भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. अर्ज नमुनासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक 023552-222271 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!