मुख्य बातमी
जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्या जाहीर

रत्नागिरी : जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी सन २०२६ या वर्षासाठी होळी सणानिमित्त २ मार्च, अनंत चतुर्दशीनिमित्त २५ सप्टेंबर आणि धनत्रयोदशी निमित्त ६ नोव्हेंबर अशा तीन सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
