आबलोली येथे २६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोलीचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.) संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर राजाराम कदम तथा आप्पा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे तसेच रक्तदानाची शतकपूर्ती पूर्णत्वाकडे नेणारे आप्पा कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
रक्तदानासाठी सरपंच सौ. नेटके (९४०४३२६३७७), उपसरपंच अक्षय पागडे (७५८८६९६१६२), प्रमेय आर्यमाने (९४०३१४३१४३), पोलीस पाटील, महेश भाटकर (९४२०७७८९१०), सचिन कारेकर (९४२३१२९७९६) यांच्याशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.


