कोतवडे हायस्कूलमध्ये एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण मुलांचे कौतुक

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडेमध्ये २०२५ मध्ये झालेल्या एनएमएमएस परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल लांजेकर, मुख्याध्यापक प्रेमदास पवार, ज्येष्ठ शिक्षक श्री. नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थी श्रावणी दत्ताराम पाष्टे, अस्मी राजेश परवडे, विभव ओंकार पोंक्षे, अंश शशिकांत कोलगे, नैतिक दिपक बारगोडे, केतन चंद्रकांत कांबळे, समर्थ जयवंत पाष्टे यांच्यासह या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. खरात, श्री. कोलगे, सौ. शितूत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, कार्यवाह संजय कोलगे, सहकार्यवाह राजेंद्र फणसोपकर व सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

