मुख्य बातमीसामाजिक

आस्था फिरते श्रवण चाचणी केंद्राचे उद्घाटन संपन्न

रत्नागिरी : आस्था दिव्यांगांसाठी समर्पित संस्था असून दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. श्रवणबाधित दिव्यांगांसाठी संस्थेमार्फत २०१८ पासून या “कानमंत्र श्रवण सक्षमतेचा” प्रकल्पाअंतर्गत नियमितपणे आस्थामध्ये शिबिर आयोजित करत केले जात आहे. त्या शिबिरादरम्यान निदान झालेल्या बालकांची शस्त्रक्रिया होऊन नियमित थेरेपी दिल्यामुळे ते बालके आता मुख्य प्रवाहात येऊन समावेशित शिक्षण पद्धतीने शिक्षण घेत आहेत. सातत्याने प्रयत्न करून देखील गरजू आपल्यापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे, कदाचित परवडत नाही म्हणून, सहज पोहचू शकत नाही म्हणून, गरजू वंचित राहत आहे, असे निदर्शनास येत होते. हे विचारात घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते.

यासाठी फिरते श्रवण चाचणी केंद्र असण्याची गरज होती. पुणे येथील रामराज्य सहकारी बँकेचे संचालक रामकृष्ण फुले, संदेश इनामके यांच्या प्रयत्नातून व रिटेनमायर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांच्या सामाजिक बांधिलकी प्रकल्पातून मॅनेजिंग डायरेक्टर रोहित राऊत व जनरल मॅनेजर संजीव चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिला. या फिरत्या श्रवण चाचणी केंद्रामध्ये नवजात बालकांसह, प्रौढांकरता ओ.ए.ई, बेरा, पी.टी.ए. आदी श्रवण चाचण्या तंत्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी साऊंड ट्रीटेड रूमची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामुळे श्रवणबाधितांच्या योग्य वेळी तपासण्या होऊन, पुढील उपचार शक्य झाल्याने त्यांना आयुष्यभर श्रवणदोष व त्याचे परिणाम सहन करावे लागणार नाही व ते समाजाचा मुख्य प्रवाहात येतील.

या फिरत्या श्रवण चाचणी केंद्राचे उद्घाटन शामसुंदर काळे यांच्या हस्ते नारळ वाढवून व सौ. चंद्रकला पाथरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी चिंतामणी मोटार्सचे उज्वल साठे, श्रीमती इंदुमती भुजबळ, कान नाक घसा तज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण, ऑडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे-सातवसे, आदित्य कन्स्ट्रक्शनच्या श्रीम.अनघा शिरीष जैतपाळ, राष्ट्रसेविका समितीच्या सौ. उमा दांडेकर आस्थाचे अध्यक्ष सौ. सविता शामसुंदर काळे, उपाध्यक्ष ऋषिकेश दिलीप दाभाडे, सचिव श्रीमती सुरेखा पाथरे, खजिनदार श्रीमती साक्षी संजय चाळके, स्पीच थेरपीस्ट संकेत संजय चाळके, सहाय्यक कल्पेश प्रमोद साखरकर, आस्था थेरपी सेंटरच्या प्रमुख संपदा कांबळे व सर्व कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!