इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी बारावी नंतरचे (बी.ए/बी.कॉम / बी.एस.सी. अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या वर्षात व्यावसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमाकरीता वरील सर्व योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांनी दिली आहे.
ज्या इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनांचे अर्ज अद्यापही भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी या योजनांचे अर्ज १० मार्चपर्यंत https:hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरून त्याची प्रत संबंधित वसतिगृहात/कार्यालयात जमा करावी , असे आवाहन सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कुवारबाव , इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह मुरुगवाडा, इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह शांतीनगर, रत्नागिरी येथे संपर्क करावा.



