मुख्य बातमीशैक्षणिक

जि.प. शाळा पूर्णगड नं.१ शाळेत वनभोजन-परिसर भेट उपक्रम उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यातील जि.प. पूर्णगड नं. १ या शाळेत वनभोजन -परिसर भेट उपक्रमांतर्गत शाळा परिसरातील पूर्णगड किल्ल्याला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना पूर्णगड किल्ल्याची माहिती देण्याबरोबरच किल्ला परिसरातील स्वच्छता करण्यात आली.

विद्यार्थ्यांना किल्ला परिसराची भौगोलिक रचना समजावून देताना शिवरायांनी गड किल्ले का स्थापन केले, त्यांची दूरदृष्टी विशद करण्यात आली. यानंतर नैसर्गिक वातावरणात मुलांना खेळायला देण्यात आले. मुलांनी विविध खेळांचा आनंद मनमुराद घेतला. विविध खेळ, अंताक्षरी, गाणी यात मुलांबरोबर पालकांनीही सहभागी होऊन शाळा विकासात पालकांचा सहभाग दाखवून दिला. निसर्गरम्य अशा परिसरात वनभोजनाचा आनंद सर्वांनी घेतला.

या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक, ग्रामस्थ या सर्वांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख संजय राणे यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ. भारती तायशेटे, सौ. पूर्वा वाकडे, सौ. भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाविषयी सर्वांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!