मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
आबलोली येथील वृत्तपत्र विक्रेते शंकर साळवी यांचे निधन

आबलोली : गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र आणि आबलोली बाजार पेठेतील वृत्तपत्र विक्रेते शंकर गंगाराम साळवी (वय ५४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवारी (१३ ऑगस्ट) रोजी पहाटे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व सहा भाऊ, भावजय, बहीण असा मोठा परिवार आहे. शंकर साळवी यांच्या निधनाने आबलोली – खोडदे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



