मुख्य बातमी

अग्नीवीर भरती रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी १ एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन

रत्नागिरी : अग्नीवीर भरती रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी १ एप्रिलपर्यंत संकेतस्थळावर सुरू आहे. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन कर्नल लष्कर भरती संचालक, भरती कार्यालय, कोल्हापूर यांनी केले आहे.

अग्नीव्हीर जनरल ड्युटी, अग्नीव्हीर तांत्रिक, अग्नीव्हीर क्लर्क/स्टोअर कीपर तांत्रिक, अग्नीव्हीर ट्रेड्समन आठवी व अग्नीव्हीर ट्रेड्समन या श्रेण्यांसाठी अग्नीव्हीर भरती रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणी १ एप्रिलपर्यंत अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर सुरू आहे. ही भरती मोहीम महाराष्ट्र राज्यातील सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी आणि गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील पात्र उमेदवारांसाठी लागू आहे.

अग्नीव्हीर कॅडेट्ससाठी वेतन आणि भत्ते :- पहिल्या वर्षी महिन्याचे वेतन ३० हजार, दुसऱ्या वर्षी ३३ हजार, तिसऱ्या वर्षी ३६ हजार ५००, आणि चौथ्या वर्षी ४० हजार मिळणार आहे. यापैकी ७० टक्के वेतन हातामध्ये तर त्यापैकी अग्नीव्हीर कोर्पस फंडमध्ये ३० टक्के वेतन जमा होणार आहे. ३० टक्के केंद्र सरकार कोर्पस फंडमध्ये जमा करणार आहे.

संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व प्रमाणिकपणे राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर दूरध्वनी क्रमांक 0231-2606419 येथे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!