मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यातील १८ शाळांना ‘आदर्श शाळा पुरस्कार’ जाहीर

जि. प. सेस योजनेअंतर्गत निवड समितीची बैठक

रत्नागिरी : ग्रामीण भागातील शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या ‘आदर्श शाळा पुरस्कार’ सन २०२५-२०२६ साठी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शाळांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील जिल्हा पातळीवरील निवड समितीची बैठक दि. ६ मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातील कनिष्ठ प्राथमिक आणि वरिष्ठ प्राथमिक अशा एकूण १८ शाळांची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम, नवभारत साक्षरता अभियान तसेच शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम यांसारख्या निकषांवरून या शाळांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या प्रमुख शाळा पुढीलप्रमाणे :

मंडणगड : जि.प. प्राथमिक शाळा गांधी चौक, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पालघर मराठी

दापोली : जि.प. प्राथमिक शाळा ऑनले नं. १, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा शिदे.

खेड : जि.प. प्राथमिक शाळा आंबडस सोलकरवाडी, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा चिचघर दस्तुरी

गुहागर : जि.प. प्राथमिक शाळा आंबतखोल तांबडवाडी, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वालोटी नं. १

संगमेश्वर : जि.प. प्राथमिक शाळा पाचेरीसडा नं. २ कवठीवाडी, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा बरबेली नं. १

रत्नागिरी : जि.प. प्राथमिक शाळा तुरळ सुवरेवाडी, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा गोठणे पुनर्वसन हातीच

लांजा : जि.प. प्राथमिक शाळा नाखरे भगवती नं. २, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा भोके मायंगडेवाडी

राजापूर : जि.प. प्राथमिक शाळा वेसुले, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा इसवली सुतार, जि.प. प्राथमिक शाळा कोंडीबळे गोतावडेवाडी, जि.प. पूर्ण प्राथमिक गोखले कन्या शाळा.

दरम्यान, बैठकीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलीमा नाईक, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) चंद्रकांत सूर्यवंशी, स.रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य विक्रांत रावराणे तसेच राज्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक माधव विश्वनाथ अंकलगे आदी उपस्थित होते.

सभेच्या शेवटी उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या परवानगीने बैठकीची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!