मुख्य बातमी

गॅस बुकिंग नोंदणी व ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ मदत

रत्नागिरी : आपल्या कार्यक्षेत्रातील गॅस ग्राहकांना गॅस बुकिंग नोंदणी व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपले ‘सरकार सेवा केंद्रांनी’ मदत करावी. याबाबत काही समस्या उद्भवल्यास संबंधित आपले सरकार सेवा केंद्राला जबाबदार ठरवण्यात येईल. याची नोंद घ्यावी, अशी सूचना उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात काही कारणास्तव गॅस टंचाईचा प्रश्न उद्भवत आहे, अशा तोंडी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयास तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांना गॅस वितरकाकडे गॅस बुकिंग नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागल्याने गॅस वितरक व ग्राहकांचा वेळ जात आहे. याची दखल जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घेतली असून, आपले सरकार सेवा केंद्रांनी जिल्ह्यातील नागरिकांना गॅस नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी मदत करावी, असे त्यांनी निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!