क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
कोतळूक येथे आजपासून टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा
राजा हिंदुस्थानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडीतर्फे सलग २६ वर्षे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील राजा हिंदुस्थानी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी यांच्या वतीने सलग २६ व्या वर्षी टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १४ ते १६ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. ही स्पर्धा गोपाळकृष्ण गोखले क्रीडानगरीत संपन्न होणार आहेत.
गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत मर्यादित क्रिकेट स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार असून विजेत्या संघास रोख २१ हजार रुपये व चषक, उपविजेत्या संघास रोख ११ हजार रुपये व चषक, तसेच मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, अंतिम सामना सामनावीर अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. बहुसंख्येने क्रीडा प्रेमी, नागरिक यांनी स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर यांनी केले आहे.


