छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा खेड तालुक्यासाठी सुधारित कार्यक्रम

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान खेड तालुक्यात ७ मार्च ते १५ मे या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा तालुक्यातील ११ महसूल मंडळातील आयोजित शिबिर कार्यक्रम असे : भोस्ते, तळे, धामणंद आणि धामणदिवी या मंडळामध्ये मार्च २०२६ मध्ये शिबिर आयोजित केले आहे. २० मार्च श्री महालिंग मंदिर धामणंद, २७ मार्च आंबडस हायस्कूल आंबडस. कुळवंडी, शिर्शी, चिंचघर, भरणे या मंडळामध्ये एप्रिल महिन्यात शिबिर होणार आहे. १० एप्रिल रोजी कुळवंडी हायस्कूल कुळवंडी, १७ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तुरी, २४ एप्रिल रोजी श्री धावजीबुवा मंदिर कोरेगाव, ३० एप्रिल रोजी श्रीदेवी काळकाई मंदिर सभागृह, भरणे.
खेड, आंबवली, लवेल या मंडळामध्ये मे महिन्यामध्ये अभियान होणार आहे. ४ मे जिल्हा परिषद शाळा आंबवली, ८ मे रोजी खेड नगरपालिका हॉल खेड, १५ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय आवाशी.
या अभियानात महसूल विषयक विविध सेवा व दाखले यांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सुधीर सोनावणे यांनी केले आहे.



