मुख्य बातमी
जागतिक किडनी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यक्रम

रत्नागिरी : जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून १२ मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यक्रम घेण्यात आला. “किडनी हेल्थ फाॅर ऑल” हे या वर्षीचे किडनी दिनाबाबतचे घोषवाक्य आहे.
यानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. भास्कर जगताप यांनी डायलोसिस वाॅर्डमध्ये जावून तेथे किडनीच्या रोगासंबंधी उपचार घेत असलेल्या रुग्णांना गुलाबपुष्प देवून, तुम्ही या रोगातून लवकरच बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.
या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. विकास कुमरे, डाॅ. सुनील ढवळे, डाॅ. उत्तम कांबळे, सिस्टर पाडावे आदी उपस्थित होते.
सध्या रत्नागिरी, लांजा, पाली, संगमेश्वर, कामथे येथे डायलोसिसची सोय उपलब्ध असून ज्यांना डायलोसिसचे उपचार घ्यायचे आहेत त्यांनी शासकीय रुग्णालयात हे उपचार मिळू शकतील, असे डाॅ. जगताप यांनी सांगितले.



