गुहागर विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धा

आबलोली (संदेश कदम) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त श्रीदेव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागरमध्ये प्राथमिक व माध्यमिक गटात वक्तृत्व व निबंध स्पर्धा संपन्न झाल्या.
प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत दुर्वा दशरथ नाटेकर (सातवी) हिने प्रथम, साकेत समीर गुरव (पाचवी) याने द्वितीय व निधी सुनील रांजाणे (सहावी) हिने तृतीय क्रमांक पटकावला. ऋग्वेद विक्रांत खरे याने उत्तेजनार्थ क्रमांकांचे सुयश संपादन केले. माध्यमिक गटामध्ये झालेल्या निबंध स्पर्धेत कार्तिकी सुनील भोसले (नववी), हिने प्रथम, अक्षरा भुलेश्वर रोहिलकर (नववी) हिने द्वितीय, तर विदिशा प्रदीप जाधव (आठवी) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक सुधाकर कांबळे व शिक्षकवृंद यांनी सुयशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.



