जाकादेवी येथे २९ रोजी धम्म क्रांती कलामंच रत्नागिरी तालुका शाखेची सभा

रत्नागिरी : तालुक्यातील धम्म क्रांती कलामंच रत्नागिरी तालुका शाखेची सर्वसाधारण सभा २९ मार्च रोजी जाकादेवी येथे दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या माता रमाई जयंती कार्यक्रमाचा जमा-खर्च वाचन करून मंजुरी घेणे, मासिक सभासद वर्गणी वसुलीचा आढावा घेऊन, वसुली बाबत विचार विनिमय करणे, येणाऱ्या काळात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत विचार करणे, सभेसाठी न येणाऱ्या सदस्या बद्दल विचार करणे व त्यावर मते जाणून घेणे, व अध्यक्षांच्या परवानगी ने येणाऱ्या आयत्या वेळीच्या विषयांवर चर्चा, या व अशा अनेक विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
ही सभा जाकादेवी येथील संतोष पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. जास्तीत जास्त सभासदांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन धम्म क्रांती कलामंच रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष रविकांत पवार तसेच सचिव सतीश कदम यांनी केले आहे.



