मुख्य बातमी

आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ, मुंबई-कोकण झोन स्पोर्ट्स कमिटी आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचा (मुले-मुली) बक्षीस वितरण समारंभ बुधवारी उत्साहात झाला. या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सौ. सीमा हेगशेट्ये यांच्या हस्ते विजेत्या खेळाडू व संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

दि. १ व २ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत ३० महाविद्यालयांतील १२० हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट बुद्धिबळ कौशल्याचे प्रदर्शन करत चुरशीच्या लढती दिल्या.

या मध्ये पुरुष गटातील [संघ] संत राऊळ महारज महाविद्यालय (कुडाळ), गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी), ज्ञानदीप महाविद्यालय (खेड) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. महिला गटात [संघ] गोगटे -जोगळेकर महाविद्यालय, दापोली अर्बन बँक महाविद्यालय (दापोली), डीबीजे महाविद्यालय (चिपळूण) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.

 

पुरुष गटातील (वैयक्तिक) अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक असे : मयुरेश परुळेकर (एसआरएम कुडाळ), श्रीहांस नारकर (डीबीजे चिपळूण), जियाद सोलकर (एस. पी. हेगशेट्ये रत्नागिरी). महिला गटातील (वैयक्तिक) प्रथम क्रमांक असे : खुशी विश्वकर्मा (डीबीजे कॉलेज), सानिया चव्हाण (एसआरएम कुडाळ), हिमानी फाटक (गोगटे जोगळेकर महाविद्यालय).

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आर्बिटर विवेक सोहनी, उपेंद्र खरे आणि साहस नारकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

संपूर्ण स्पर्धा नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. अभिजीत हेगशेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, कोकण झोन स्पोर्ट्स कमिटीचे सचिव शशांक उपशेट्ये, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे, प्राध्यापक, संघ व्यवस्थापक, विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते. महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी महाविद्यालये, खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!