गुहागर राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा ओम पारकर चौथ्या फेरीत दाखल

गुहागर : प्रदीप परचुरे आणि कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने भंडारी भवन गुहागर, येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या चौथ्या फेरीत रत्नागिरीच्या ओम पारकरने ठाण्याच्या कुणाल राऊतवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २०-१८, १६-१५ व २०-८ असा पराभव करत चौथी फेरी गाठली. तर रत्नागिरीच्याच योगेश कोंडविलकरने पुण्याच्या आयुष गरुडाला सरळ दोन सेटमध्ये १६-६, १८-१० असे नमवून आगेकूच केली.
तिसऱ्या फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे :
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल : झैद अहमद फारुकी (ठाणे) विरुद्ध विजयी मंगेश कासारे (मुंबई) २५-४, २५-०.
राजेश गोहिल (रायगड) विरुद्ध विजयी सुरज कुंभार (मुंबई) १९-१४, २५-०.
पंकज पवार (ठाणे) विरुद्ध विजयी विजय पाटील (मुंबई उपनगर) २५-५, २५-०.
हितेश कदम (मुंबई उपनगर) विरुद्ध विजयी राहुल भस्मे (रत्नागिरी) २४-११, १३-२३, २५-१४.
समीर अंसारी (ठाणे) विरुद्ध विजयी सुदेश वाळके (मुंबई उपनगर) २५-६, २५-४.
रियाझ अकबर अली (रत्नागिरी) विरुद्ध विजयी विलास आंबवले (ठाणे) २५-०, २५-८.
अमोल सावर्डेकर (मुंबई) विरुद्ध विजयी हेमंत पांचाळ (मुंबई) २५-१५, १७-९.
दिनेश केदार (मुंबई) विरुद्ध विजयी ब्लेसिंग सामी (ठाणे) २५-३, २५-१.
सागर वाघमारे (पुणे) विरुद्ध विजयी सुजित जाधव (रत्नागिरी) २५-५, २५-१.
ओमकार टिळक (मुंबई) विरुद्ध विजयी अब्दुल हमीद (रायगड) २५-०, २५-०.
रवींद्र हंगे (पुणे) विरुद्ध विजयी आशिष सिंग (मुंबई उपनगर) १८-२०, २४-९, २५-१.
विश्वजित भावे (ठाणे) विरुद्ध विजयी जोनाथन बोनल (पालघर) २५-९, २५-९.



