मुंबईच्या प्रसिद्ध ज्वेलरी मेकर अश्विनी करकरे देणार महिलांना कौशल विकास प्रशिक्षण
इन्फिगो फाउंडेशनकडून रत्नागिरीत पुन्हा एकदा ज्वेलरी प्रशिक्षणाचे आयोजन

रत्नागिरी : आजकाल विविध प्रकारची ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे. मुली, महिलांना अशी आकर्षक ज्वेलरी फार आवडते. अनेकींना अशी आधुनिक ज्वेलरी स्वतः करायची इच्छा असते. तर काहींना येत असली तरी विविध डिझाईन्स मिळाली तर हवी असतात. पण आपल्या आजूबाजूला पटकन असे काही उपलब्ध होतेच असे नाही. हाच मुद्दा विचारात घेऊन इन्फिगो फाउंडेशने सामाजिक जाणिवेतून व महिलांनी स्वावलंबी व्हावे याकरिता रत्नागिरीमध्ये शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी खास आधुनिक ज्वेलरी मेकिंगचे कौशल्य प्रशिक्षण आयोजित केले आहे.
मुंबईच्या सुप्रसिद्ध डिझाईन व ज्वेलरी मेकर सौ. अश्विनी करकरे या प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे प्रशिक्षण इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल, साळवी स्टाॅप, रत्नागिरी येथे होणार आहे. यामध्ये लागणारे विशेष प्रकारचे साहित्य इन्फिगो फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. याशिवाय स्वतः तयार केलेला बांगड्या, हार व कानातले असा सेट प्रत्येकीला मिळणार आहे, तो ही मोफत.
मागील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला २०० महिलांनी सहभाग घेतला आणि उत्तम प्रतिसाद दिला व त्यांनी केलेल्या मागणीनुसार अजून ऍडव्हान्स शिकायची इच्छा व्यक्त केली. म्हणूनच या प्रशिक्षण वर्गात बेसिक आणि ऍडव्हान्स अशा २ कोर्स कार्यशाळेची योजना तयार करण्यात आली आहे. ऍडव्हान्स कोर्समध्ये केवळ ७० आणि बेसिकमध्ये फक्त ८० महिलांना प्रवेश दिला जाईल. या कार्यक्रमालाही उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आशा इन्फिगो फॉउंडेशनची आहे
प्रशिक्षणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
बेसिक कोर्स : ११ एप्रिल २०२५
वेळ : दुपारी १ ते ३.३० किंवा सायंकाळी ४.३० ते ७.००
ऍडव्हान्स कोर्स : १२ एप्रिल २०२५
वेळ : सकाळी १० ते दुपारी १२.३० किंवा दुपारी २.३० ते ५.००
प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी 9021502206 या क्रमांकावर आपली नाव नोंदणी करून सहभाग निश्चित करायचा आहे. ऍडव्हान्स कोर्ससाठी २०० रुपये, तर बेसिक कोर्ससाठी १०० रुपये शुल्क स्वीकारले जाईल. इच्छुकाचे नाव, पत्ता व फोन नंबरवरील व्हाट्सअँप नंबरवर पाठवून आपली नोंदणी पूर्ण करा. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित आहेत. नोंदणी करणाऱ्यांना कार्यक्रमाविषयी अधिक तपशील वैयक्तिक कळविण्यात येईल. २ एप्रिल २०२५ अखेरपर्यंत नोंदणी मुदत आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे इन्फिगो फाउंडेशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे.



