क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लांजाच्या जाणता राजा ग्रुपतर्फे आयोजित मिनी शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

चिपळूणच्या आर. बी. बॉईज संघ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी 

लांजा : येथील जाणता राजा ग्रुप आणि आमदार किरण सामंत पुरस्कृत मिनी शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. यात सावर्डे (ता. चिपळूण) येथील आर. बी. बॉईज संघाने प्रथम, महालक्ष्मी चिपळूण संघाने द्वितीय, एस. एम. चिपळूण संघाने तृतीय, तर रत्नागिरीच्या दत्तप्रासादिक घुढेवठार संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.

विजेत्यांना अनुक्रमे १५,५५५ रुपये, ११,१११ रुपये, ७,७७७ रुपये, ३,३३३ रुपये आणि प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी उत्कृष्ट नेटमन म्हणून अजय (महालक्ष्मी चिपळूण), उत्कृष्ट शूटर व डीगर म्हणून रुजान बोंबल (आर. बी. बॉईज, सावर्डे) यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रत्येकी ५०० रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिळून २९ संघ सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली.

यावेळी आमदार किरण सामंत, नगराध्यक्षा सावली कुरुप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, गटनेते योगेश कावतकर, नगरसेविका वंदना काटगाळकर, सांगली जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी प्रमोदजी कदम, पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, मुख्याधिकारी अभिजीत कु़ंभार, प्रसन्न शेट्ये, मुन्ना खामकर, बाबा भिंगार्डे, विवेक आंबेकर, स्वरूप शेट्ये, प्रसाद डोर्ले, लावू कांबळे, ज्येष्ठ खेळाडू विद्याधर कामत, सुधाकर पत्की, डॉ. बारसकर, विनोद सावंत, सामाजिक कार्यकर्ते दीपक कामत, संजय तेंडुलकर, जाणता राजा ग्रुप लांजाचे सर्व शिलेदार, विनय बुटाला, राजू धावणे, अभिजीत राजेशिर्के, आदींची उपस्थिती होती.

स्पर्धा उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मकरंद पंत लिंगायत यांनी केले. संदीप मयेकर यांच्या यांनी समालोचन केले. पांडरंग शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी जाणता राजा ग्रुप लांजाचे सर्व शिलेदार संजय चव्हाण, मंगेश लांजेकर, संदीप कुंभार , किशोर कांबळे, भीमराव कांबळे, राज शेट्ये, राजा लांजेकर, समीर शेट्ये, निखिल शेट्ये, गणेश शेट्ये, प्रकाश पांचाळ, सौरभ चव्हाण, सुभाष जाधव, दिलीप जाधव, किरण कांबळे, आदिनाथ पाटील, डॉ. धालवलकर, विनोद सावंत, संतोष हांदेभाऊ, दीपक कामत आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!