मुख्य बातमी

अश्लील भाषा व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून र्निदोष मुक्तता

रत्नागिरी : अश्लील भाषा व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून दोघांची र्निदोष मुक्तता करण्यात आली.

याबाबत वकिलांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील पऱ्याची आळी, विठ्ठल मंदिराच्या मागे राहणारे रणधीर विजय शेट्ये व मेधा विजय शेट्ये यांनी फिर्यादीस अश्लील भाषा वापरून, तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार फिर्यादीने ८ डिसेंबर २०१९ रोजी दिली होती. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०९, २९४, ३५२, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या केसचे कामकाज मे. चिफ ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट रत्नागिरी यांच्या न्यायालयात चालले.

सरकार पक्षाच्या वतीने या केसमध्ये चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यांचा उलटतपास आरोपींच्या वतीने ॲड. संदीप तुकाराम ढवळ यांनी केला. उलट तपासामध्ये महत्त्वाच्या कबुली साक्षीदारांकडून घेण्यात आल्या होत्या. आरोपींच्या वतीने केलेला युक्तीवाद व केस लॉ विचारात घेऊन मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी आरोपींची भा. दं. वि. कलम ५०९, २९४, ३५२, ५०६ व ३४ या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ॲड. संदीप ढवळ, ॲड. अमित सोलकर, ॲड. पंकज बाणे, ॲड. शैलेश नावले व ॲड. शुभम आयरे यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!