भाजपा स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता अभियान उत्साहात

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या उपस्थितीत ६ एप्रिलपासून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ८ एप्रिल रोजी मंगळवार आठवडा बाजार नाचणे रोड (रत्नागिरी) येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सकाळी ६.४५ वाजता आयोजित या अभियानात सर्व पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि शहर मंडळ प्रमुख दादा ढेकणे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, कार्यक्रम प्रमुख शेखर लेले, शैलेश बेर्डे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, उपाध्यक्ष अशोक वाडेकर, चिटणीस राजेंद्र पटवर्धन, पदवीधर सेलचे मनोज पाटणकर, नगरसेवक सुप्रिया रसाळ, नितीन जाधव तसेच विशाखा भिडे, निलेश आखाडे, भक्ती दळी, सायली बेर्डे, मोहन पटवर्धन, संतोष सावंत, नरेंद्र कदम, संजय आठल्ये, प्रवीण देसाई, प्रसाद बाष्टे, समीर वस्ता, तुषार देसाई, अद्वैत कुलकर्णी, मनोहर दळवी, मंदार भोळे, सोनाली केसरकर, मनाली राणे, अनघा अखीरकर, सारिका शर्मा, प्रणीत लेले, गुरुराज कुलकर्णी, किशोर लेले, अर्चना वैशंपायन, प्राची लेले, कैवल्य नातू, रश्मी लेले, आनंद ओक, अविनाश सावंत व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वच्छता अभियानांतर्गत मंगळवार आठवडा बाजार परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. यावेळी नगरपालिका कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.


