मुख्य बातमी

केंद्रीय मराठी शाळा हरचिरी क्रमांक १ च्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी शिवराम कदम

रत्नागिरी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रीय मराठी शाळा हरचिरी क्रमांक १ च्या माजी विद्यार्थ्यांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी शिवराम विठ्ठल कदम यांची एकमुखाने निवड करण्यात आली. गोरखनाथ जानू बने यांची उपाध्यक्षपदी, स्वप्नेश श्रीकांत लिंगायत यांची कोषाध्यक्ष पदी, तर सचिव म्हणून मुख्याध्यापक रमेश रतन सुर्वे यांची निवड करण्यात आली.

सदस्य पदी अनिकेत अनिल करंबेळे, विराज प्रमोद पानसरे, सौ. संजीवनी संतोष वेल्ये, जितेंद्र गौतम पवार, संतोष तुकाराम तळेकर, संदेश लक्ष्मण पानसरे, सुरेंद्र जानू जाधव शिक्षक यांची निवड करण्यात आली.

उपस्थितांना संबोधित करताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. कदम यांनी सर्वांना सोबत घेऊन शाळेचा सर्वांगीण विकास आणि प्रगती करून, संपूर्ण जिल्ह्यात आपल्या शाळेचा यशाचा झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त केला. सर्व स्तरातून या माजी विद्यार्थी संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!