मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा मार्चअखेरपर्यंत ३६० कोटींचा निधी पूर्णपणे खर्च

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्चअखेरपर्यंत १०० टक्के खर्च करण्यात यशस्वी झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेला ३६० कोटींचा अर्थसंकल्पीय नियतव्यय पूर्णपणे खर्च झाला आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होण्यापूर्वी केवळ ६० टक्के निधी खर्च झाला होता; मात्र, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सातत्याने यंत्रणांचा आढावा घेतल्याने, शेवटच्या आठवड्यात उरलेला ४० टक्के निधीही खर्च झाला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ साठी मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय ३६० कोटी होता. त्यापैकी आतापर्यंत दिलेल्या प्रशासकीय मंजुरीही ३६९.८४ कोटींची होती. तर वितरित केलेला संपूर्ण ३६० कोटींचा निधी यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाने १०० टक्के खर्च केला आहे. अनुसूचित जाती उपयोजना २०२४-२५ चा मार्च-२०२५ अखेर झालेला खर्च आर्थिक वर्षामध्ये २९ कोटी मंजूर होता. तसेच पूर्ण निधी प्रत्यक्ष प्राप्त झालेला असून, पूर्ण निधी संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आलेला आहे. त्याची टक्केवारी १०० टक्के आहे.

जिल्हा नियोजन विभागाचा निधी गेल्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ६० टक्केच खर्च झाला होता. उर्वरित निधी ६ दिवसांमध्ये जिल्हा प्रशासन कसा खर्च करणार याकडे लक्ष होते. परंतु दरवर्षी अखेरच्या टप्प्यात १०० टक्के निधी खर्च केला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेला सर्वांत जास्त म्हणजे १९८.८८ कोटी म्हणजे ५५.२४ टक्के, राज्यस्तरीय योजनांना ११२.०६ कोटी म्हणजे ३१.१३ टक्के, तर नगरपालिकांना ४९.०६ कोटी म्हणजे १३.६३ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह वार्षिक योजना २०२४-२५ साठी मंजू अर्थसंकल्पीय नियतव्यय ३६० कोर्ट एवढा १०० टक्के खर्च झाला आहे.

२०२४-२५ साठी या आर्थिक वर्षामध्ये १ कोटी १२ लाख ४६ हजार मंजूर होता. तसेच पूर्ण निधी प्रत्यक्ष प्राप्त झालेला असून, १ कोटी १२ लाख ४६ हजार निधी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला आहे. हा निधीदेखील १०० टक्के खर्च झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!