मुख्य बातमी

रत्नागिरीत पहाटे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस 

गणपतीपुळे येथे पत्रे उडून नुकसान

रत्नागिरी : पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान आल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यातील गणपतीपुळे येथे पहाटे तीन वाजता झालेल्या वादळी पावसामुळे समुद्र किनाऱ्यावरील हॉटेल पत्रे उडाले आहेत.

पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल जाणवू लागला. ढग दाटून आल्यानंतर काही वेळात हलक्या प्रमाणात विजाही चमकू लागल्या. दरम्यान, रत्नागिरी शहरातही पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वारे वाहू लागले. पावसाची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती; मात्र अचानक झालेल्या या वातावरणातील बदलामुळे महावितरणची बत्तीही काही काळासाठी गुल झाली होती. अगदी १५ ते २० मिनिटांच्या सोसाट्याच्या वाऱ्यानंतर वातावरणात पुन्हा पूर्ववत झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!