मुख्य बातमी

मेर्वीच्या जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत डाॅ. आंबेडकर जयंती उत्साहात 

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक श्री हिदायत भाटकर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विषय शिक्षिका सौ. शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, ऐश्वर्या गुरव, शालेय मुख्यमंत्री मैत्रेयी अभ्यंकर, उपमुख्यमंत्री रचित म्हादये आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमात मेर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त भाषणे केली. मुख्याध्यापक श्री. भाटकर, विषय शिक्षिका सौ. करगुटकर, उपशिक्षक श्री. पेटकर आदींनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मार्गदर्शनातून कथन केले.

यावेळी इयत्ता पाचवीतील विद्यार्थी आराध्य सिद्धार्थ पावसकर याने डॉ. आंबेडकर यांची वेशभूषेतील साकारली होती. सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ही भूमिका या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते. सौ. करगुटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!