मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कोंडगाव, साखरपा सरपंच पोटनिवडणूक : धनश्री जोशी, रश्मी साळसकर विजयी

संगमेश्वर : तालुक्यातील कोंडगाव आणि येथे झालेल्या सरपंच पोटनिवडणुकीत धनश्री राजेंद्र जोशी यांनी अटीतटीच्या लढतीत विजय संपादन केला. त्यांनी प्रतिस्पर्धी रूपाली राजेंद्र कीर यांचा ५७ मतांनी पराभव करत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली.

या निवडणुकीत एकूण १३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये धनश्री जोशी यांना ६८५ मते मिळाली, तर रूपाली कीर यांना ६२८ मते मिळाली. तसेच २० मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. संपूर्ण निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. अखेर धनश्री जोशी यांनी थोडक्यात आघाडी घेत विजय मिळवला.

साखरपा ग्रामपंचायतीच्या सरपंच पोटनिवडणुकीत रश्मी रवींद्र साळसकर यांनी प्रतिस्पर्धी भाग्यश्री संजय सुर्वे यांचा १२४ मतांनी पराभव करत विजय मिळवला.

या निवडणुकीत एकूण ८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये रश्मी साळसकर यांना ४६३ मते मिळाली, तर भाग्यश्री सुर्वे यांना ३३९ मते मिळाली. तसेच २२ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!