मुख्य बातमी

श्री भैरी जुगाई टेंभ्ये शिमगोत्सव कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी : तालुक्यातील टेंभ्ये गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई शिमगोत्सावाला प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक १२ मार्च रोजी सुरुवात होणार आहे. पालखीला रूपे लावण्याचा कार्यक्रम ३ वाजता सुरू होईल. नंतर धार्मिक विधी झाल्यानंतर ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई ची पालखी श्री सिध्देश्वर मंदिरात येईल.

दिनांक १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीच्या भेटीला ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई टेंभ्ये श्री सिध्देश्वर मंदिरातून ढोल-ताशांच्या गजरात काजरघाटी, नाचणे, मारुती मंदिर, एसटी स्टँड, मारुती आळी, गोखलेनाका, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भवन, श्री मुर्लीधर मंदिर खालची आळी येथून श्री देव भैरी मंदिरात भेटीसाठी रात्री ८.३० पर्यंत जाईल. तेथे भाविकांच्या दर्शनासाठी अर्धा तास मंदिरात थांबेल. तेथून परत खालची आळीमागे, श्री मुर्लीधर मंदिर मार्गे, काँग्रेस भवन, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, धनजीनाका मार्गे सिटी पोलिस स्टेशन येथे जाईल. तेथून धनजी नाका, गवळीवाडा, हेडक्वाटर, श्री. महापुरुष मंदिर, पोलिस लाईन मार्गे माळनाका येथून वाहनाने टेंभ्ये येथे मुख्य मानकरी कै. सदानंद साखाराम साळवी यांची आरती घेऊन वरचे टेंभ्ये येथे होळी तोडण्याच्या ठिकाणी थांबेल.

दिनांक १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता होळी तोडण्याचा कार्यक्रम होईल. तेथून होळीसह पालखी पारंपरिक वाटेने श्री भैरी जुगाई मंदिर टेंभ्ये येथे सहानेवर विराजमान होईल. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ३ वाजता होळी उभी करण्यात येईल. होळीची विधीवत पूजा होईल. नंतर गावगाऱ्हाने होऊन ओट्या भरण्याचा कार्यक्रम होईल. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भैरीजुगाई वरदायीनी भराडीन देवस्थान टेंभ्येच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!