मुख्य बातमी
गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा २३ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.
श्री स्वामी देवांचा पूर्ण कृपेने व गुरुमाऊली गुरुदेव दास दिगंबर महाराजांच्या आशीर्वादाने राजापूर तालुक्यातील कशेळी येथे श्री स्वामी समर्थांची पालखी २३ एप्रिल रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता येणार आहे. श्री स्वामी समर्थांची पालखीचे दर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत घेता येणार आहे.
सर्व भाविकांनी श्री स्वामी समर्थ नामाचा गजर, महाआरती आणि त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदकुमार फोडकर, विश्वास फोडकर, गुरुनाथ फोडकर यांनी केले आहे.



