मेर्वी गुरववाडी जिल्हा परिषद शाळेची मंथन व बीडीएस स्पर्धा परीक्षेत उत्तुंग कामगिरी

गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी जि. प. प्राथमिक गुरववाडी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या मंथन स्पर्धा परीक्षा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी या सेमी इंग्रजी शाळेने भाग घेतला होता. या परीक्षेमध्ये विहान निलेश म्हादये याने केंद्रात पहिला, रत्नागिरी तालुक्यात २८ वा, जिल्ह्यात ४७ वा, तर महाराष्ट्र राज्यात ५७ वा क्रमांक प्राप्त केला.
तसेच भूमिका प्रवीण नागवेकर केंद्रात तृतीय आली. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. ही बाब शाळेसाठी भूषणावह आहे.
सन २०२५-२६ वर्षामध्ये बीडीएस स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडीचा निकालही १०० टक्के जाहीर झाला आहे.
या परीक्षेत भूमिका प्रवीण नागवेकर (चौथी), निनाद मनोज खर्डे (चौथी), विहान निलेश म्हादये (तिसरी), गंधार सत्यवान पेटकर (तिसरी) कैवल्य ओंकार अभ्यंकर (तिसरी) ही सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला.
या यशाबद्दल ग्रामस्थ, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती यांनी समाधान व्यक्त केले असून विशेष बाब म्हणून शाळेचे संस्थापक दिलीप विठ्ठल गुरव यांनी शाळेला भेट देवून प्रत्येक मुलांना पुष्प देवून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच या शाळेचे मुख्याध्यापक मसरज शेख व श्रीमती शनाज भाटकर यांचे सुद्धा पुष्प देवून स्वागत करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात शैक्षणिक प्रगती मध्ये चढता आलेख पाहून दिलीप गुरव यांनी समाधान व्यक्त केले आणि हा शैक्षणिक आलेख असाच चढता राहुदे, असे प्रतिपादन केले.
तसेच कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ. सत्यश्री खर्डे, मदतनीस सौ. स्नेहल कुरतडकर, श्रीमती शारदा गुरव यांची उपस्थिती लाभली होती.


